Pandharpur : कामदा एकादशीनिमित्त पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सजलं, हिरव्यागार द्राक्षांची आकर्षक सजावट
Continues below advertisement
पंढरपूर : मराठी नववर्षात येणारी वारकरी संप्रदायातील पहिली यात्रा म्हणजे चैत्री यात्रा होय. तसे मराठी जणांचा चैत्र महिना हा जत्रा आणि यात्रांचा महिना अशी ओळख असते. या महिन्यात गावोगावी यात्रा आणि जत्रा भारत असतात. या यात्रेची दुसरी ओळख म्हणजे चैत्र यात्रेमधून हरी हरा भेद नाही, हा संदेश वारकरी संप्रदाय जगाला देत असतो. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने ही वारी मोठ्या देवाची अर्थात महादेवाची असते. शिखर शिंगणापूर येथे महादेवाच्या विवाहातील महत्वाचा दिवस चैत्र शुद्ध एकादशीला असतो. त्यामुळे वारकरी या दिवशी विठुराया अर्थात हरी आणि महादेव अर्थात हर या दोघांचे दर्शन करीत असतात.
Continues below advertisement