आमलकी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराची सजावट, मंदिराला द्राक्षं-फुलांची आकर्षक सजावट
Continues below advertisement
आमलकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या मंदिराला द्राक्षे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आज फाल्गुन शुद्ध अर्थात आमलकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या मंदिराला द्राक्षे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी झेंडू, शेवंती, आर्केड ऍथोरियम, केळीचे खुंट या सोबत 100 किलो द्राक्षांचा वापर विठ्ठल-रुक्मिणी गाभारा सजवण्यासाठी करण्यात आला आहे. मात्र नानासाहेब पाटील यांनी थेट द्राक्ष व फुलांच्या मदतीने आकर्षक सजावट केली आहे. आकर्षक फुलांनी तयार केलेलं 'जय हरी' 'राम कृष्ण हरी' लक्ष वेधून घेत आहे. सध्या आपल्या बागेत पिकलेली द्राक्षे देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी अनेक भाविक येत असतात.
Continues below advertisement