Pandharpur : कार्तिकी एकादशीच्या यात्रेनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक रोषणाई ABP Majha

Continues below advertisement

पंढरपुरात दोन वर्षांनी होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या यात्रेनिमित्तानं विठ्ठल मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आलीय. विविध रंगी एलईडी दिव्यांच्या आकर्षक रोषणाईनं विठ्ठल मंदिर उजळून निघालं. विठ्ठल मंदिराचे कळस, नामदेव पायरी, पश्चिम द्वार, व्हीआईपी गेटसह मंदिराच्या चारही बाजूंनी रोषणाई करण्यात आलीय. सात मजली दर्शन मंडपावरही आकर्षक दिव्यांच्या माळा सोडण्यात आल्या आहेत. मंदिराच्या आताही विठ्ठल सभामंडप या विविध रंगी दिव्यांनी न्हाऊन निघाला असून उद्या होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या महासोहळ्यासाठी मंदिर समितीनं हजारो विठ्ठल भक्तांना ही अनोखी भेट दिली आहे . दोन वर्षांनी कार्तिकी यात्रा होत असली तरी या यात्रेवर एसटी संपाचं सावट आहे. यात्रेसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या सोडल्या असल्या तरी गावोगावचे वारकरी एसटीनं पंढरपुरात दाखल होतात. एसटी बंद असल्यानं त्यांची गैरसोय झाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram