
Pandharpur : संत सावता माळींच्या भेटीसाठी विठुराया अरणकडे प्रस्थान ठेवणार
Continues below advertisement
संत सावता माळी यांच्या भेटीसाठी आज खुद्द विठुराया अरणकडे प्रस्थान ठेवणार आहे. आषाढी एकादशीसाठी सर्व संतांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांना घेऊन विठुरायाच्या भेटीला पंढरीकडे येत असतात. मात्र विठुराया फक्त संत सावता माळी यांच्या भेटीसाठी अरणकडे जाण्याची परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे. आज सकाळी देवाच्या पादुका अरणकडे प्रस्थान ठेवतील.
Continues below advertisement