Pandharpur Vitthal Mandir : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या तळघरात गवसला पुरातन ठेवा

Continues below advertisement

Pandharpur Vitthal Mandir : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या तळघरात गवसला पुरातन ठेवा

सोलापूर: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या (Pandharpur Vitthal Mandir) संवर्धनाचं काम सुरु असतानामोठं गूढ उलगडलं. गुरुवारी रात्री 2 वाजता हनुमान गेटजवळ दोन दगडी फरशा खाली पोकळ भाग जाणवल्यावर या कामगारांनी ते दगड हलवून पहिले. त्यावेळी त्याच्या खाली अरुंद तळघर असल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर शुक्रवारी दुपारी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पुरातत्व विभागाच्या टीमला पाचारण केले  

शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान या तळघरावरील दगड काढून आत कर्मचारी उतरले असता समोरच्या बाजूला जवळपास 8 फूट लांब आणि 6 फूट उंच अशी खोली दिसून आली. यानंतर सुरक्षेचे नियम पळत येथे कर्मचारी उतरवून त्यांनी येथे तपासणी केली असता यात भुयारी खोलीत काही जुन्या मुर्ती असल्याचे समोर आले. 

गुप्त खोलीत काय काय सापडलं? 

सुरुवातीला काही लहान मूर्ती, काही जुनी नाणी बाहेर काढण्यात आली. यामध्ये एक भग्न पादुका, एक भग्न लहान स्त्रीची मूर्ती आणि एक लहान देवीची मूर्ती बाहेर काढण्यात आली. यानंतर साडेतीन फूट उंच अशी व्यंकटेशाची मूर्ती बाहेर काढली. ही मूर्ती अनेक वर्षे मातीत राहिल्याने खराब झालेली असून याच्या हातावर पद्म , चक्र असल्याचे दिसून आले . 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola