Pandharpur Temple : आजपासून विठुरायाचे 24 तास दर्शन, कार्तिकी यात्रेसाठी देवाचा पलंग निघाला
Pandharpur Temple : कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीतजास्त भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी आजपासून देवाचे राजोपचार बंद करून 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. आज सकाळी अकरा वाजता विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात आला. यंदा दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त कार्तिकी यात्रा होणार असल्याने संपूर्ण यात्रा काळात आजपासून लाखो भाविकांना 24 तास दर्शन मिळणार आहे.