Sadabhau Khot | महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षाचे आमदार भाजपच्या संपर्कात : सदाभाऊ खोत
Continues below advertisement
सध्या कोरोनाच्या संकटापुढे आघाडी सरकार क्वॉरन्टाईन झाले असून नागरिकांना उपचारासाठी बेड मिळत नाहीत ना टेस्टिंग केले जात. मतदारसंघात विकासकामाला निधी नाही, यामुळेच तीनही पक्षातील आमदाराच्या मोठी नाराजी असून पुढील दोन महिन्यात मध्य प्रदेश, राजस्थानपेक्षा मोठी फूट महाराष्ट्रात झालेली दिसेल, असा दावा माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. महाराष्ट्रातील तीनही पक्षातील मोठ्या संख्येने आमदार भाजपशी संपर्क साधत असून एक मोठा पक्षच फुटलेला दिसेल असं त्यांनी सांगितलं.
Continues below advertisement