Pandharpur : Putrada ekadashi निमित्त विठ्ठल मंदिरास आकर्षक फुलांची आरास ABP Majha

Continues below advertisement

श्रावण शुद्ध अर्थात पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील नानासाहेब पाचुंदकर पाटील यांनी फुलांची सेवा दिली. कोरोना संकटामुळे विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद असलं तर मंदिरातील परंपरा अखंडित सुरु आहे. त्यामुळे भक्ताकडूनही आपापल्या परीनं विठ्ठलाप्रती सेवा अर्पण करण्यात आली. मंदिरातील सोळखांबी, चौखांबी, विठ्ठल-रुक्मिणीच्या गाभाऱ्यात आकर्षक आरास मांडण्यात आलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram