Pandharpur Majha Impact : पंढरपुरातल्या खचलेल्या पालखी मार्गाची वेगाने दुरूस्ती
Pandharpur Majha Impact : पंढरपुरातल्या खचलेल्या पालखी मार्गाची वेगाने दुरूस्ती आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी ज्या मार्गाने जातात तेथे खचलेल्या मार्गाची दुरुस्ती वेगाने सुरू झाली आहे . काळी माती जवळपास ९ मीटर उंच भराव करून केलेला रस्ता खचू लागल्याचे माझाने समोर आणल्यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तातडीने हा संपूर्ण भाग खोदून दुरुस्तीचे आदेश दिले होते . त्यानुसार आता हा खोदलेल्या भारावच्या मागे असणाऱ्या संरक्षण भीतीच्या अलीकडे आरी ब्लॉक वापरून भिंत उभारली जत आहे . या भीतीच्या दोन्ही बाजूला मुरूम भरण्यात येत आहे . रात्रंदिवस हे काम सुरू असून आता ५ मीटर उंचीपर्यंत काम पूर्ण झाले आहे . अजून ४ मीटर उंचीचे काम व रस्त्याचे काम येत्या आठ दिवसांत पूर्ण होणार आहे . आता पहिल्या संरक्षक भीतीच्या अलीकडे अजून एक मजबूत संरक्षक भित घेतल्याने रस्ता खाचाण्याचा धोका संपणार आहे . माझा ने वेळीच ही बाब लक्षात आणून दिल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करत हे काम वेगाने करण्याचे आदेश दिले होते . अशाधीसाठी येणारे पालखी सोहळे १३ जुलै रोजी या मार्गावरून जाणार असून त्यापूर्वी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे . या दुरुस्तिकामामुळे भविष्यातील संभाव्य धोके संपणार आहेत .