Pandharpur Mauli Corridor : पंढरपूरच्या विकास आराखड्याबाबत पालकमंत्री विखे पाटलांनी बोलावली बैठक
पंढरपूरच्या विकास आराखड्यावरून स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतलीय. नवा विकास आराखडा आणि माऊली कॉरिडॉरमुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांना विस्थापित व्हावं लागणार आहे. याबाबतचं वास्तव एबीपी माझानं समोर आणल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याची दखल घेतलीय. पालकमंत्र्यांनी याबाबत प्रशासनाबरोबर बैठक बोलावली आहे. आज होणाऱ्या या बैठकीकडे पंढरपूरातील नागरिक आणि वारकऱ्यांचंही लक्ष लागलंय.