Pandharpur : पंढरपुरातील माघी सोहळ्यावर दुष्काळाचं सावट, उजनी धरणाची पाणी पातळी खालवली
माघी सोहळ्यासाठी आज दशमीला पंढरपूरमध्ये चार लाखापेक्षा जास्त भाविक पोचले असून विठुरायाच्या दर्शनाची रांग पाच किलोमीटरवर असणाऱ्या गोपाळपूर पर्यंत पोचली आहे . यावेळी पहिल्यांदाच माघी यात्रेतही दर्शन रांगेतील भाविकांना मीराला वॉटर , चहा , नाष्टा आणि भोजनाची सोया मंदिर समितीकडून करण्यात आली असल्याने भाविकांना दर्शन रांगेत १० ते १२ तास उभारणे सुसह्य बनले आहे . दर्शन रांगेत गोपाळपूर येथे १० पत्रा शेड उभारण्यात आली असून हि पत्रा शेड भरून रांग बाहेर गेली आहे . सध्या विठुरायाच्या दर्शनाला १० ते १२ तास लागत असून मंदिर प्रशासनाने यात्राकाळात पाद्यपूजा आणि तुळशी अर्चन पूजा बंद ठेवल्याने दर्शनाला जादाचे ३ तास भाविकांना मिळाले आहेत . आषाढी आणि कार्तिकी वगळता इतर यात्रेत मंदिर २४ तास उघडे नसते त्यामुळे सकाळी सहापासून सुरु झालेले दर्शन फक्त महानैवेद्य , पोशाख आणि धुपारती या तीन नित्योपचाराच्या काळात बंद राहते . सध्या देवाच्या पदस्पष्ट दर्शनाला आज १२ तसंच वेळ लागत असून उद्या माघी एकादशी असल्याने अजून दीड ते दोन लाख भाविक वाढण्याची शकयता आहे . माघी यात्रेसाठी वाढत चाललेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने १३९४ पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला असून शहरात १६२ सिसि टीव्ही च्या माध्यमातून आणि ६ वॉच टॉवरच्या मदतीने गर्दीवर लक्ष ठेवण्यात येत आहे .