Pandharpur Kartiki Yatra : कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी,भाविकांच्या निवासाची मोफत सोय

Pandharpur Kartiki Yatra : कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी , 65 एकरमधील भक्तिसागर निवास तळावर व्यवस्था 
कार्तिकी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांची 65 एकर मधील भक्तीसागर या वारकरी निवास तळावर मोफत निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज दशमी दुपारपर्यंत 2 लाख भाविक निवासासाठी आले असून 497 प्लॉटपैकी 308 प्लॉटचे वाटप झाले आहे. आज दिवसभर येणाऱ्या जवळपास दीड लाख भाविकांच्या निवासाची सोय इथे होऊ शकणार आहे. या ठिकाणी वीज, पाणी, रस्ते, स्वच्छतागृहे, आरोग्य व्यवस्था शासनाकडून पुरवण्यात आली आहे . भक्तीसागरमधील या मोकळ्या प्लॉटवर हजारो भाविक राहुट्या आणि तंबू उभारुन निवास करत असतात . आज दिवसभर दाखल होणाऱ्या दिंड्या आणि भाविकांना इथे मोफत निवास करता येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola