
Kartiki Ekadashi : Pandharpur मध्ये वैष्णवांचा मेळा, ड्रोनद्वारे चंद्रभागा नदी तीरावरील विहंगम दृष्य
Continues below advertisement
कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात आज वैष्णवांचा मेळा भरला आहे. विठ्ठल नामाच्या जयघोषाने अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी दाखल झाले आहेत. काल रात्री उजनी धरणातून सोडलेले पाणी चंद्रभागेत पोचलंय.. भाविक चंद्रभागेत स्नान करून लाडक्या विठुरायाचं दर्शन घेतायत... चंद्रभागा नदी तीरावरील गर्दीवर सोलापुर पोलिसांकडून ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाते आहे... ड्रोनच्या माध्यमातून गर्दीची विहंगम दृष्य टिपण्यात आलीेएत
Continues below advertisement