Pandharpur: पोलिसांवर गाढवं सांभाळण्याची वेळ ABP Majha
Continues below advertisement
सोलापूर जिल्ह्यातील बेकायदा धंद्याबाबत विधानसभेत खमंग चर्चा झाल्यानंतर देखील वाळू उपसा जोरदार सुरु असून त्यामुळे बेकायदा वाळू उपासणार्यांना पकडायच्या ऐवजी शहर पोलिसांना त्यांची गाढवे पकडून समाधान मानावे लागत आहे . त्यामुळे आता शहर पोलीस ठाण्यात वाळू उपसा करणाऱ्या गाढवांची कोंडवाडा उभा करायची वेळ आली आहे . मात्र हि कारवाई दिखाऊ असून भीमा नदीच्या काठावरील प्रत्येक गावात शेकडो वाहने बेकायदा वाळू उपसा करीत असून या बड्या धेंडांवर कारवाई करायची सोडून गाढवे पकडून काम केल्याचे प्रशासन दाखवत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे .
Continues below advertisement