
Gudhipadwa | गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा गाभारा पानाफुलांनी सजला
Continues below advertisement
सध्या सर्वत्र कोरोनाची दहशत असल्याने विठुरायाचा पाडवा देखील बंद मंदिरातच होत असला तरी परंपरा म्हणून मंदिर समितीने मिळेल त्या फुलात विठुराया व रुक्मिणी मातेचा गाभारा कर्मचाऱ्यांकडून सजवून घेतला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी देवाचे नित्योपचार प्रथेनुसार मंदिर समिती पुजारी आणि कर्मचाऱ्यांकडून करत असते. पाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस असल्याने विठुरायाच्या गाभाऱ्यात सोनचाफा, मोगरा आणि इतर सुगंधी फुले तसंच पानांची सजावट केली आहे. देवाच्या प्रसन्नतेतून मानवजातीवरील कोरोनाचे संकट लवकर दुर व्हावे हि भावना नक्कीच आहे .
Continues below advertisement