Pandharpur Flood | चंद्रभागेतील मंदिर पाण्याखाली, घाट निम्यापेक्षा जास्त पाण्याखाली
चंद्रभागा नदीत सध्या नव्वद हजार क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग सव्वा लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. उजनी आणि वीर धरणातून एक लाख दहा हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे चंद्रभागेतील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत, तर घाट निम्म्यापेक्षा जास्त बुडाले आहेत. पाण्याचा प्रचंड वेग असूनही मोठ्या संख्येने भाविक धोकादायक पाण्यात स्नानासाठी उतरत आहेत. प्रशासनाने लावलेले लोखंडी बॅरिकेड्स तोडून भाविक थेट नदीत पोहोचत आहेत. प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा इथे कुठेही दिसत नाही. एबीपी माझाने यापूर्वीच हे वास्तव दाखवले होते, मात्र प्रशासनाकडून कुठल्याही हालचाली दिसल्या नाहीत. सध्या भाविकांना या पाण्यात उतरण्यापासून रोखणे आवश्यक आहे, परंतु प्रशासनाचा एकही अधिकारी उपस्थित नाही. "एखादी दुर्घटना घडली तर ह्याला जबाबदारं ही प्रशासन असणार आहे." अशी परिस्थिती असतानाही प्रशासनाची उदासीनता कायम आहे.