Pandharpur Development Plan : स्थानिक नागरिक शासनाला देणार 15 दिवसांत आराखडा
पंढरपूर विकास आराखडा आणि कॉरिडॉर हा वारकऱ्यांना केंद्रबिंदू मानून बनविण्यात आला असला तरी स्थानिक नागरिकांना उध्वस्त करून राबविला जाणार नसल्याची ग्वाही विखे पाटील यांनी दिली.. दरम्यान नागरिकांनी आपला आराखडा येत्या 15 दिवसात देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांना दिल्यावर शासनाचा आराखडा आणि नागरिकांचा आराखडा हे दोन्ही समोर ठेऊन निर्णय घेतले जाणार आहेत.