Pandharpur Darshan Queue : पंढरपूर मंदिरात दर्शन रांगेला सहा फूट जाळ्या, घुसखोरी होणार बंद
Pandharpur Darshan Queue : पंढरपूर मंदिरात दर्शन रांगेला सहा फूट जाळ्या, घुसखोरी होणार बंद
विठ्ठलाच्या दर्शन रांगेला लावल्या सहा फूट जाळ्या, आषाढी यात्रा काळात विठ्ठलाच्या दर्शन रांगेत होणारी घुसखोरी बंद करण्यासाठी मंदिर समितीकडून उपाययोजना
आषाढी यात्रा काळात विठ्ठलाच्या दर्शनाची रांग मंदिरापासून सात ते आठ किलोमीटर लांब जात असते. अशावेळी भाविक तीस तीस तास दर्शन रांगेत उभे राहत असतात. यामध्ये वृद्ध लहान मुले महिला यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. दर्शन रांगेत जास्त वेळ उभे राहावे लागू नये यासाठी अनेक भाविक ठिकठिकाणी दर्शन रांगेत घुसखोरी करीत असतात. याचा नाहक त्रास वृद्ध भाविकांनी महिलांना सोसावा लागत असतो. आता अशा घुसखोर भाविकांना पायबंध घालण्यासाठी मंदिर समितीने दर्शन रांग ही सहा फूट जाळ्या लावून बंद करण्याचे काम सुरू केल्याने आता अशा भाविकांना रांगेत घुसता येणार नाही. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी