आजपासून 2 हजार भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता येणार; भक्तांचा प्रतिसाद पाहता मंदिर संस्थानाचा निर्णय
Continues below advertisement
माझाच्या इम्पॅक्टनंतर पंढरपूर मंदिर समितीने आजपासून दोन हजार भाविकांना दर्शनाची व्यवस्था सुरू केली असून संख्या दुपटीने वाढवूनही काल पहिल्या तासातच ऑनलाईन बुकिंग फुल झाले आहे. गेल्या आठ महिन्यापासून विठुरायाच्या दर्शनाचा विरह सहन करणारे देशभरातील भाविक ऑनलाईन दर्शन संकेतस्थळ सुरू होताच बुकिंग मिळविण्यासाठी धडपडत होते. त्यामुळे पहिल्या तासातच दिवसभरातील 10 स्लॉट फुल झाले आहेत. मंदिर समितीकडे अजूनही दर्शन संख्या वाढवायची मागणी भविकांकडून होत असून, वाढवलेल्या संख्येमुळे भविकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे
Continues below advertisement