
Pandharinath Phadke Death : पंढरीनाथ फडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
Continues below advertisement
Pandharinath Phadke Death : पंढरीनाथ फडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन महाराष्ट्र बैलगाडा संघटेनेचे अध्यक्ष आणि गोल्डमॅन अशी ओळख असलेल्या पंढरीनाथ फडके (Pandharinath Phadke) यांचे निधन झाले आहे. पनवेल येथे रूग्णालयात हृदयविकाराने त्यांचे निधन झालं. महाराष्ट्रभर छकडा फेम म्हणून त्यांची ओळख होती. पनवेलच्या विहिघर येथील असलेल्या पंढरीनाथ फडके यांना बैलगाडा शर्यतीची मोठी आवड. महाराष्ट्रात कुठेही बैलगाडा शर्यत असेल तर त्या ठिकाणी ते हजर असायचे. तसेच शर्यतीच्या 40 हून जास्त बैलं त्यांच्याकडे होती. सरकारने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्यानंतर ती परत सुरू करावी यासाठी पंढरीनाथ फडके यांनी प्रयत्न केले होते.
Continues below advertisement