Palghar Farmers Loss : कापणीला आलेल्या भातशेतीचं मोठं नुकसान, तातडीने मदत करा

Continues below advertisement

Palghar Farmers Loss : कापणीला आलेल्या भातशेतीचं मोठं नुकसान, तातडीने मदत करा पालघर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून या पावसामुळे भात शेतीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल आहे . 90 दिवसांच असलेल हळवं भात पीक पूर्णपणे तयार झाल असतानाच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने हे पीक जमीनदोस्त झाल आहे . जिल्ह्यात असलेल्या 75 हजार हेक्टर भात लागवड क्षेत्रापैकी 25 हजार हेक्टर वरील हळवं भात पिक काढणी योग्य झाल असतानाच परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे हे तयार झालेल भात पीक शेतकऱ्यांच्या हातून जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे . या सगळ्या नुकसानीचे पंचनामे करून सरकारने मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे . याच परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्याची प्रतिक्रिया जाणून घेतले आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram