Palghar Dapchari Dairy Project : पालघरच्या दापचारी दुग्ध प्रकल्प धोक्यात, घरावरील संकट दूर होणार?

 मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरांना मुबलक दुग्ध पुरवठा व्हावा म्हणून तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दापचरी या भागातील दुग्ध प्रकल्प धोक्यात आलाय. . जवळपास सहा हजार हेक्टर जमीन संपादित करून या ठिकाणी हा दुग्ध प्रकल्प उभारण्यात आला. हा प्रकल्प सुरळीत चालावा म्हणून प्रशासनाकडून शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करण्याचं आवाहन करण्यात आलं.  मात्र कालांतराने हा उभा राहिलेला प्रकल्प प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे डबघाईला गेला, आणि तेव्हापासून येथे आलेले शेतकरी अडचणीत सापडले. पालघर मधील दापचरी येथील दुग्ध प्रकल्पात राहणाऱ्या 160 पेक्षा अधिक कुटुंबांना आपले घर आणि युनिट खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आले आहेत. त्यामुळे या कुटुंबियांसमोर आता आव्हानांचा डोंगर उभा ठाकलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola