Palghar Rain : पालघरच्या डहाणूत जोरदार पाऊस; जनसागर धरण ओव्हरफ्लो

Continues below advertisement

Palghar Rain : पालघरच्या डहाणूत जोरदार पाऊस; जनसागर धरण ओव्हरफ्लो पालघर जिल्ह्यात आज सलग पाचव्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे ठीक ठिकाणी सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे तर जिल्ह्यातील सूर्या वैतरणा पिंजाळ देहरजा या प्रमुख नद्या दुथडी भरून वहायला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच धामणी धरण 64 टक्के भरले असून कवडास धरण ओवर फलो झाल आहे. तर लावणी केलेली भात शेती पाण्याखाली जायला सुरुवात झाली आहे. जर असाच पाऊस सुरू राहिला तर जनजीवन विस्कळीत होण्याची पाळी निर्माण होण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन करण्यात आला आहे.
      सूर्या नदीला मोठा पूर आला असून सूर्या नदी ही दुथडी भरून वाहत आहे जर असाच पाऊस सुरू राहिला तर सूर्य नदी ही धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे तर अजून दोन दिवस पालघर जिल्ह्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच परिस्थितीचा सूर्या नदीच्या किनाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram