Palghar Accident News : इअरफोनमुळे आवाज आला नाही, ट्रेनच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
Palghar Accident News : इअरफोनमुळे आवाज आला नाही, ट्रेनच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
मोबाईलचा अतिवापर एका विद्यार्थिनीच्या जीवावर बेतला आहे . कानातील एअरफोनमुळे ट्रेनचा आवाज न आल्याने ट्रेनच्या लागलेल्या धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पालघर मध्ये समोर आली आहे . पश्चिम रेल्वेच्या पालघर मधील सफाळे रेल्वे स्थानकाजवळ रूळ ओलांडताना माकने गावातील वैष्णवी रावल या विद्यार्थिनीला राजधानी एक्सप्रेसने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला . माकने जवळ पश्चिम रेल्वेवर उड्डाणपूल नसल्याने येथील रहिवासी धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडतात . त्यातच अनेक विद्यार्थ्यांच्या कानात नेहमीच इयरफोन असल्याने त्यांचं येणाऱ्या गाड्यांकडे देखील लक्ष नसतं यातूनच हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे . वैष्णवीच्या या मृत्यूनंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते