Nagpur RSS : नागपूरमध्ये रेकी करणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला काश्मीरमध्ये अटक, समोर आली मोठी माहिती
Continues below advertisement
नागपुरात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदकडून रेकी केल्याचं समोर आलं. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसराची जैशकडून रेकी करण्यात आली. आरएसएसच्या मुख्यालयासह रेशीम बागमधील संघाच्या डॉ. हेडगेवर स्मृती मंदिर परिसर आणि इतर काही संवेदनशील ठिकाणांची पाहणी केली आणि वृत्ताला नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही दुजोरा दिलाय. जुलै महिन्यात एका तरुणानं नागपुरात दोन वास्तव्य केलं आणि या सगळ्या परिसरांची रेकी केली.
Continues below advertisement