Imran Khan Arrest Case : इमरान खान यांची सुटका करा, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Continues below advertisement

Imran Khan Arrest Case : इमरान खान यांची सुटका करा, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

 

Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची अटक बेकायदेशीर असून त्यांना तातडीने सोडा असा आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेसंदर्भात गुरुवारी 11 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायाधीश उमर अता बंदियाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सुनावणीवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.  

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीशांनी इम्रान खान यांना अटक केल्यानंतर एनएबीला चांगलेच फटकारले होते. तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. यावेळी मुख्य न्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी इम्रान यांना इस्लामाबाद न्यायालयाच्या परिसरातून अटक करण्यावर प्रश्न उपस्थित केला होता. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने (SC) गुरुवारी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोला (NAB) पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांना तासाभरात न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले. न्यायालयात हजर राहिल्यानंतर सरन्यायाधीशांनी पीटीआय प्रमुखांच्या सुटकेचे आदेश जारी केले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram