Pakistan Drone Attack Jaisalmer : अंधार होताच पाकिस्तानची कुरापत! जैसलमेर भागात केला ड्रोन हल्ला

नवी दिल्ली : या आधी तोंडावर आपटूनसुद्धा पाकिस्तान सुधारला नसल्याचं दिसून येतंय. गुरुवारी केलेले सर्व ड्रोन हल्ले अपयशी ठरल्यानंतर पाकिस्तानने शुक्रवारी रात्रीही तोच कित्ता गिरवल्याचं दिसतंय. अमृतसर आणि जैसेलमेर या शहरांवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला. या दोन्ही ठिकाणचे हल्ले भारताने परतवून लावल्याची माहिती आहे. 

अमृतसरमध्ये जगप्रसिद्ध सुवर्णमंदिर असून त्याला पाकिस्तान लक्ष्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमृतसरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. जैसलमेरमध्येही पाकिस्तानचा पुन्हा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं दिसतंय. पाकिस्तानचे चार ड्रोन भारतानं पाडले.  

नागरी विमानांच्या आड पाकिस्तानचा हल्ला

गुरुवारपासून पाकिस्तानची आगळीक सुरूच असून पाकिस्तानकडून वेगवेगळ्या शहरांमध्ये गोळीबार सुरू केला आहे. त्याला भारतीय सैन्याने जशास तसं उत्तर दिलं. नागरी विमानांच्या आड पाकिस्तानकडून भारतावर ड्रोन हल्ले होत असल्याचं समोर आलं आहे. भारताकडून प्रत्युत्तर मिळेल या भीतीनं पाकिस्तानकडून नागरी विमानांची ढाल करण्यात येत आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola