Buldhana Urban Union : बुलडाणा अर्बनमधील विशेष आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून रात्रभर चौकशी
Continues below advertisement
Buldhana Urban Bank : आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली पतसंस्था म्हणजे बुलडाणा अर्बन. बुलडाणा अर्बनच्या मुख्य शाखेत काल सकाळपासून एक 11 जणांचं आयकर विभागाचं पथक पतसंस्थेत दाखल झालं आहे. या पतसंस्थेमार्फत झालेल्या काही विशेष आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी हे पथक दाखल झालेलं आहे. रात्रभर हे पथक बुलढाणा अर्बनच्या मुख्य कार्यालयात विशेष आर्थिक व्यवहारांची चौकशी करत आहे. अजूनही हे पथक चौकशी करत आहे. दरम्यान बुलढाणा अर्बनच्या मुख्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुणालाही आत जाता येत नाही. प्रसारमध्यामांना कुठलीही माहिती या पथकाकडून किंवा बुलढाणा अर्बनकडून दिली जात नाहीये. बुलढाणा अर्बनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयकर विभागाच्या विशेष आर्थिक व्यवहारांची चौकशी करणारे हे पथक आहे.
Continues below advertisement