Osmanabad | प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानला निघालेला 'उस्मानाबादचा पठ्ठ्या' अखेर घरी परतला

Continues below advertisement
उस्मानाबाद पोलिसांच्या सतर्कतेने फेसबुकवर ओळख झालेल्या प्रेयसीला भेटणासाठी निघालेला उस्मानाबादचा झिशान सिद्दीकी अखेर घरी परतला आहे. रात्री उशिरा उस्मानाबाद पोलिसांचं एक पथक झिशानला घेऊन दाखल झाले. ख्वाजानगर उस्मानाबाद येथील मौलाना सलीम सिद्दीकी यांचा मुलगा झिशान हा मेकॅनिकल अभियांत्रिकी शिक्षण घेतो. फेसबुकवर पाकिस्तानची मुलगी सामराच्या संपर्कात आला होता. तिच्या प्रेमात पडल्यानंतर तिला भेटण्यासाठी 11 जुलैला सकाळी 10 वाजता घर सोडून सायकलवर अहमदनगर व तेथून मोटार सायकलने गुजरात स्थित कच्छच्या भारत पाक सिमेपर्यंत पोहचला होता. त्याची वडिलांनी तो मिसींग असलेल्याची तक्रार नोंदवली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram