Womens Missing Issue | महिलांच्या बेपत्ता होण्यात राज्याचा प्रथम क्रमांक | ABP Majha
महाराष्ट्र महिला आणि मुली सुरक्षित आहेत का असा सवाल वारंवार विचारला जातो. तर या बातमीवरुन त्या प्रश्नाचं उत्तर नाही असं म्हणता येईल. कारण नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या २०१६, २०१७ आणि २०१८च्या अहवालानूसार बेपत्ता झालेल्या मुलं आणि महिलांच्या यादीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतोय. तर महाराष्ट्रा पाठोपाठ मध्यप्रदेशातून सर्वाधिक महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण आहे.