Sambajiraje on Vadettiwar | ओबीसीमध्ये का येत नाही? विजय वडेट्टीवारांची विचारणा; संभाजीराजेंचा दावा
ओबीसी समाजाचे नेते म्हणून ओळख असलेल्या विजय वडेट्टीवार यांच्याबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गौप्यस्फोट केला आहे. तुम्ही ओबीसीत का येत नाही अशी विचारणा वडेट्टीवार यांनी खासगीत केल्याचा दावा संभाजीराजे यांनी केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत संभाजीराजे यांनी हे सांगितलं. संभाजीराजेंच्या या दाव्यावर विजय वडेट्टीवारांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.