ST Strike : उस्मानाबादमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप, एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाची मागणी
Continues below advertisement
उस्मानाबादमध्ये एसटी कर्मचारी, वाहक आणि चालक यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. वेळेवर पगार मिळत नसल्याने आणि तुटपुंज्या पगारामुळे कर्मचारी आक्रमक झालेत. आपल्या समस्या आणि भावना मांडताना कर्मचारी यांना अश्रू अनावर झाले. मागण्या मान्य होईपर्यंत एकही बस आगाराबाहेर जाऊ देणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
Continues below advertisement