Cleaning Staff Strike | राज्यातल्या एसटी बस आणि स्थानकातील साफसफाई बंद
एसटी बसस्थानक आणि बसमधली साफसफाई आता बंद झाली आहे. मागील ५ महिन्यांपासून साफसफाई कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेलं नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कालपासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे. राज्य परिवहन महामंडळ थकीत रक्कम देत नाही, तोपर्यंत कामगाराचं वेतन देता येणार नाही, अशी भूमिका ब्रीक्स कंपनीनं घेतल्यानं सामान्य कामगार रस्त्यावर आलेत. एसटीच्या साफसफाईचं टेंडर ब्रीक्स कंपनीकडे आहे.