Osmanabad : अरेच्चा! एकाच घरात राष्ट्रपती आणि पंतप्रधान ABP Majha

Continues below advertisement

 राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना जन्माचा दाखला मिळाला नाही.. असं कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही.. आश्चर्य वाटून घेऊ नका. हि गोष्ट काही खऱ्या खुऱ्या राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांची नाहीये. तर घटना आहे उस्मानाबादची.. उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यातल्या चिंचोली भुसणी येथील एका दाम्पत्याने त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव राष्ट्रपती तर दुसऱ्या मुलाचं नाव पंतप्रधान ठेवलंय. आता या दोघांचा जन्म दाखला काढण्याची जेंव्हा वेळ आली तेंव्हा पहिल्या मुलाला जन्माचा दाखला मिळाला. मात्र दुसऱ्या मुलाला जन्माचा दाखलाच मिळाला नाही. याचं कारण विचारण्यासाठी जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात  धाव घेतली, तेव्हा पंतप्रधान हे संविधानिक पद असल्याने ते नाव म्हणून वापरता येत नसल्याचं सांगण्यात आलं. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram