Uddhav Thackeray | सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे; मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांशी संवाद

सोलापूर जिल्ह्यात पाहणी दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. सकाळी सोलापूर विमानतळावरुन उद्धव ठाकरे हे तुळजापूर तालुक्यातील काटगाव या गावात पाहणी दौरा करतील. जवळपास 10 हजार लोकसंख्या असलेल्या काटगावात मोठ्या प्रमाणात ऊस आणि सोयाबीनची लागवड केली जाते. अतिवृष्टीमुळे गावातून वाहणाऱ्या हरणी नदीला अनेक वर्षांनंतर पूर आला. या पुरात हाताशी आलेलं संपूर्ण पीक अक्षरशः वाहून गेलं आहे, उभं ऊस आडवं झालं आहे. शेतीचं अतोनात झालं असून घरांची देखील पडझड झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून इथल्या ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola