Osmanabad Gramin Bank : थकीत कर्जाची परतफेड करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेनं दिली मोठी सवलत
Continues below advertisement
थकीत कर्जाची परतफेड करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेनं मोठी सवलत जाहीर केली आहे. अशी सवलत जाहीर करणारी महाराष्ट्र ग्रामीण बँक पहिलीच बँक ठरलीय. बँकेची महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना १ जानेवारीला जाहीर करण्यात आलीय. त्यात थकीत कर्जाच्या व्याजात तब्बल ६० ते ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ३१ मार्चपर्यंत ही योजना लागू राहणार आहे.
Continues below advertisement