Osmanabad : अवैध कत्तलखान्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला ABP Majha
Continues below advertisement
तुमचं आमचं रक्षण करणारे पोलीसच असुरक्षित असल्याचं बुलढाणा आणि उस्मानाबादमधल्या घटनांनंतर म्हणण्याची वेळ आलीय. डीजेला विरोध केला म्हणून थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला करण्यात आल्याची घटना बुलढण्यात घडलीय... तर उस्मानाबादमध्ये अवैध कत्तलखान्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गावगुंडांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस समाधान नवले यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर बबन जाधव हे देखील गंभीर जखमी झालेत. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याचंही समजतंय. धक्कादायक बाब म्हणजे हा अवैध कत्तलखाना नगरसेवक खलिफ कुरेशी यांचा असल्याचा आरोप होतोय. पोलिसांनी नगरसेवर खलिफा कुरेशी, त्याचा भाऊ कलीम कुरेशी यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केलाय.
Continues below advertisement