उस्मानाबादेत एकाचवेळी 19 जणांवर अंत्यसंस्कार, जागा अपुरी पडल्याने 8 मृतदेहांचा अंत्यविधी लांबणीवर

Continues below advertisement

उस्मानाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती अतीगंभीर होताना दिसत आहे. उस्मानाबादच्या स्मशानभूमीत याची प्रचिती आली. उस्मानाबाद स्मशानभूमीत काल कधी न पाहिलेले चित्र पाहायला मिळालं.  बुधवारी एकाचवेळी  19 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आले. तर 8 मृतदेहांवर आज अंत्यविधी करण्यात येणार आहे. हे चित्र पाहून अनेकांच्या भावना दाटून आल्या. 

उस्मानाबाद शहरानजिक असलेल्या असलेल्या स्मशानभूमीत काल 19 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्यामुळे अवघ्या एक-एक फुटावर सरण रचण्यात आली होती. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.अंत्यसंस्कारासाठी जागा पुरत नसल्यामुळे 8 मृतदेहांवर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही चिंताजनक बनत आहे. इतकच काय तर सरण रचण्यासाठी लाकडं कमी पडत आहेत. त्यामुळे कमी लाकडांवरच मृतदेहांवर अंत्यविधी केले जात आहेत. उस्मानाबादचे हे चित्र पाहून अनेकांना रडू देखील कोसळल्याचे पाहायला मिळाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram