Orphans Help : अनाथ मुलांना आश्रमात 18 ऐवजी 23 वर्ष पूर्ण होईपर्यंत राहता येणार!

Continues below advertisement

मुंबई :  राज्यभरातील 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनाथाश्रमातून बाहेर पडणाऱ्या मुलांची व्यथा 'एबीपी माझा'ने दाखवल्यानंतर आता राज्यभरातून मदतीचा ओघ या मुलांसाठी सुरू झाला आहे. एबीपी माझाच्या बातमीची दखल घेऊन  महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील अनुरक्षण गृहांमध्ये पात्र मुलांना अनुरक्षण सेवा पुरविण्यासाठी वयाची अट दोन वर्षांनी शिथिल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे या बालकांना अनुरक्षण गृहांमध्ये अधिकची दोन वर्षे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, प्रशिक्षण आदी सुविधा मिळणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram