अनाथ मुलांना आता वयाच्या 23 वर्षांपर्यंत अनाथाश्रमात राहता येणार, 'माझा'च्या बातमीनंतर मोठा निर्णय
Continues below advertisement
बाल न्याय अधिनियमात 'बालक' या संज्ञेसाठी नमूद वयाची अट पूर्ण झाल्यामुळे बालकांच्या काळजीसाठी कार्यरत संस्थातून बाहेर पडावे लागू शकणाऱ्या बालकांना सध्याची कोरोना परिस्थिती पाहता मोठा दिलासा देण्याचा निर्णय राज्याच्या महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या निर्देशानुसार राज्यातील अनुरक्षण गृहांमध्ये पात्र मुलांना अनुरक्षण सेवा पुरविण्यासाठी वयाची अट दोन वर्षांनी शिथिल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे या बालकांना अनुरक्षण गृहांमध्ये अधिकची दोन वर्षे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, प्रशिक्षण आदी सुविधा मिळणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Yashomati Thakur Orphanage Orphans Orphan Orphan Children Shrikant Bharatiya Tarpan Institute Help For Orphans