G 20 Mumbai : जी 20 चं शिष्टमंडळ थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार : ABP Majha
-२०चं शिष्टमंडळ आज मुंबईत दाखल होणार आहे.. जी -२० परिषदेअंतर्गत केंद्रीय पर्यावरण विभागांतर्गत मेगा बीच क्लीन इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे.. त्या पार्श्वभूमीवर जी-२०चं शिष्टमंडळ जुहू चौपाटीवर दाखल होणार आहे..
जुहू चौपाटीवर राज्य सरकारकडून तसंच मुंबई पालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आलीये.. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री दाखल झालेत तर थोड्याच वेळात राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत...