Nitesh Rane: रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या संघटना विष पसरवतात- नितेश राणे ABP Majha
भोंगा हा महत्त्वाचा मुद्दा नाही, तर रझा अकादमीसारख्या संघटना खरी समस्या आहे असं भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटलंय. रझा अकादमी, पीएफआय या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी नितेश राणेंनी केलीय. रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या संघटना समाजात विष पसरवतात, असा आरोप नितेश राणे यांनी केलाय.