Orange Alert Thane | ठाण्यात मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले

हवामान विभागाने ठाणे, मुंबई यासोबतच नवी मुंबईचा जो भाग आहे त्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. या अंदाजानुसार ठाण्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. सध्या पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला असला तरी, सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. वंदना डेपो परिसर आणि तलाव पाळीचा परिसर जलमय झाला आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनाकडून पंपाच्या सहाय्याने काम सुरू आहे. सकाळी कामावर निघालेल्या ठाणेकरांना या पाण्यातूनच वाट काढावी लागली. पहाटे साडे पाच ते साधारणपणे सात वाजेपर्यंत ठाणे शहरात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळेच हे सखल भागांमध्ये पाणी साचलेले पाहायला मिळाले. ऑरेंज अलर्टमुळे दिवसभर सुद्धा ठाणे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola