Maharashtra Rain: पुणे, सातारा, कोल्हापूरला आज ऑरेंज अलर्ट ABP Majha
Continues below advertisement
राज्यात जुलैच्या सुरुवातीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. राज्याच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण झालीय. आतापर्यंत या पावसात ९९ जणांचा बळी गेलाय. तर १८१ जनावरं दगावलीत. तर आजवर ८ हजार नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलंय. आज पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. रायगड, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर मुंबई, ठाणे, रत्नागिरीमध्ये यलो अलर्ट देण्यात आलाय. तिकडे गुजरातमध्येही पावसाने विश्रांती घेतल्याने पूर ओसरलाय. परिणामी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पाणी कमी झालंय. त्यामुळे या मार्गावर बंद असलेली वाहतूक पुन्हा एकदा सुुरु झालीय.
Continues below advertisement
Tags :
Kolhapur Pune Satara Raigad Palghar July Heavy Rains Orange Alert Precedent 99 Killed 8 000 Civilians Evacuated