Opposition on Ajit Pawar : विधान परिषदेत अजित पवारांचं वक्तव्य; विरोधकांचं टीकास्त्र

Opposition on Ajit Pawar : विधान परिषदेत अजित पवारांचं वक्तव्य; विरोधकांचं टीकास्त्र   शिपाई असो किंवा आयएएस अधिकारी किंवा कोणतीही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी शिक्षणाची अट असते.. पण त्याच सुशिक्षित, उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सरकार चालवणाऱ्या नेत्यांना मात्र शिक्षणाची कोणतीही अट नसते...  गेली कित्येक वर्ष हा मुद्दा वादाचा ठरलाय.. पण लोकहित डोळ्यांसमोर ठेवून व्यवस्था चालवणं आणि उच्च शिक्षण हे जोडीनंच यायला हवं असं नाही, हे वसंतदादा पाटलांसारख्या नेत्यांनी अवघ्या महाराष्ट्राला ठसठशीतपणे सांगितल.. पण त्याच नेत्यांचा वारसा सांगणारे, महाराष्ट्राचे आजचे नेते मात्र भर विधिमंडळात उच्च शिक्षणाची जी खिल्ली उडवतायत, ते पाहून या नेत्यांनी किमान शाळेचं शिक्षण तरी धड घेतलंय का असा प्रश्न पडतोय... आणि हा प्रश्न का पडलाय ते जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट पाहा

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola