Opposition On Akshay Shinde : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर विरोधकांचे संतप्त सवाल

Continues below advertisement

Opposition On Akshay Shinde : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर विरोधकांचे संतप्त सवाल

ही बातमी पण वाचा

Sharad Pawar: कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती, परंतू...; एन्काऊंटवर शरद पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar: मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आल्यानंतर पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती देताना आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तर, विरोधकांकडून एन्काऊंटरच्या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) राजीनाम्याची मागणी करत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या घटनेवर अनेस प्रश्न उपस्थित करत कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत गृहमंत्र्यांना ताबडतोब पदावरुन हटवलं पाहिजे, अशी मागणी केली आहे. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही सवाल उपस्थित केले आहेत.   

बदलापूर एन्काऊंटर प्रकरणावरुन राजकीय प्रतिक्रिया येत असून या खटल्यातील सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेवर लगेच सुरू झालेले आरोप प्रत्यारोप दुर्दैवी आहे. या प्रकरणातल्या सर्व बाबींवर पोलीस तपासानंतर अधिक तथ्य समोर येणार असल्याचं उज्वल निकम यांनी म्हटलं. तसेच, याप्रकरणी न्यायालयीन चौकशी होईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, या प्रकरणी शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

''बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे.'', असे शरद पवार यांनी ट्विट करुन म्हटलं आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram