Opposition Leader On Nana Patole : कार्यकर्त्याने धुतले नाना पटोलेंचे पाय; विरोधकांकडून टीकेची झोड

Continues below advertisement

Opposition Leader Nana Patole : कार्यकर्त्याने धुतले नाना पटोलेंचे पाय; विरोधकांकडून टीकेची झोड

बुलढाणा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी कार्यकर्त्याकडून हाताने स्वत:चे पाय धुवून घेतल्यामुळे टीकेचे धनी बनले आहेत. एका गावात संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचे चिखलात माखलेले पाय कार्यकर्त्याने हाता-पाण्याने धुतले होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता काँग्रेसकडून (Congress) सारवासारव करण्यात येत आहे. त्यातच, नानांचे पाय धुणारा कार्यकर्ता विजय गुरव नॉट रिचेबल असल्याने पुन्हा एकदा ही चर्चा रंगली आहे. तसेच, विजय गुरव नेमका कोठे गेला, असा प्रश्ना काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे.  

नागपूर येथून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोमवारी संध्याकाळी 5 वाजता समृद्धी महामार्गाने वाडेगावात आले होते. वाडेगावात 6.30 वाजता नाना पटोलेंचा वाढदिवस आणि लोकसभा निवडणुकांतील यशासाठी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाकडून नानांची लाडुतूला करण्याचा कार्यक्रम होता. नियोजित कार्यक्रमानुसार नानांनी कार्यक्रमानंतर 7.30 वाजता भाषण संपवून ते वाडेगावातील नानासाहेब चिंचाळकर विद्यालयाच्या मैदानात थांबलेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनाला गेले होते. 

अनवाणी पायांनी मैदानात गेले होते नाना

मैदानात पावसामुळे मोठा चिखल असल्याने नाना हे पालखी असलेल्या मैदानात अनवाणी दर्शनाला आले होते. येथील पालखीचे दर्शन संपवून नाना पटोले आपल्या गाडीकडे गेले असता, गाडीजवळ विजय गुरव या शेगावातील कार्यकर्त्याने नानांचे चिखलात माखलेले पाय आपल्या हाताने धुतले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी नाना पटोलेंवर जोरदार टीका केली आहे. तर, काँग्रेसलही लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे, काँग्रेसकडून हे प्रकरण काळजीपूर्वक हाताळले जात आहे. त्यातच, नानांचे पाय धुणारा कार्यकर्ता नॉट रिचेबल असल्याने तालुक्यात चर्च रंगली आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram