Bahawalpur Operation Sindoor : बहावलपूर येथिल दहशतवाद्यांचं तळ भारतीय सैन्यानं असं केलं जमीनदोस्त
Bahawalpur Operation Sindoor : बहावलपूर येथिल दहशतवाद्यांचं तळ भारतीय सैन्यानं असं केलं जमीनदोस्त
भारताने 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकिस्तान आणि पिओके मध्ये दहशतवादी तळांना लक्ष्य करत आतंगवाद्यांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात ही दहशतवादी प्रशिक्षण आणि भरती केंद्रे बेचिराख झाली. यामध्ये मसूद अजहरच्या जैश-ए- मोहम्मदची टेरर फॅक्टरी उद्ध्वस्त केली. उपग्रह प्रतिमांमधून पाकिस्तानमध्ये झालेला विध्वंस स्पष्टपणे दिसून येत आहे.
भारतीय सैन्याने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव वाढला आहे. . भारतीय हवाईदलाने एअर स्ट्राईक (Air Strike) करत पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले असून यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. उपग्रह प्रतिमांमधून हल्ला करण्यापूर्वी आणि हल्ला झाल्यानंतर काय परिस्थिती झाली हे पाहता येईल.