TOP 70 : सकाळी 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 July 2024 : ABP Majha
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजपासून 'ऑपरेशन सिंदूर'वर विशेष चर्चा होणार आहे. संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि परराष्ट्र मंत्री सरकारची बाजू मांडणार असून, पंतप्रधानही यात सहभागी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर 'INDIA' आघाडीची बैठक होणार असून, विरोधीपक्ष रणनीती ठरवणार आहे. काँग्रेसने खासदारांना व्हीप बजावला आहे. 'हम किसीको छेड़ते नहीं और छोड़ते भी नहीं,' असे म्हणत शिंदेंनी ठाकरेंना इशारा दिला. श्रीकांत शिंदेंवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर हे प्रतिउत्तर होते. गृहमंत्री योगेश कदम यांच्यावरील डान्स बारप्रकरणी आरोपांवर रामदास कदम आक्रमक झाले. मुंबई-गोवा महामार्गावरुन रामदास कदमांनी भरत गोगावलेंना टोला लगावला. मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, कैलास गोरंट्याल आणि सुरेश वरपुडकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. रत्नागिरी आणि मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये शिवमंदिरात चेंगराचेंगरी होऊन अठरा जण जखमी झाले आहेत. पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. तीन ऑगस्टला पवार कुटुंबिय एकत्र येणार असून, मुंबईत युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा होणार आहे. राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता असून, अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.