PM Modi Speech : शत्रूच्या घरात घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त, मोदींचा पाकड्यांना इशारा

पंधरा ऑगस्टच्या दिवशी 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीर जवानांना सलाम करण्याची संधी मिळाली. पहलगाममध्ये सीमापारच्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून लोकांची हत्या केली, पत्नीसमोर पतीला गोळ्या घातल्या, मुलांसमोर वडिलांना मारले. या क्रूर हल्ल्यामुळे संपूर्ण देश संतप्त होता. 'ऑपरेशन सिंदूर' ही त्याच संतापाची अभिव्यक्ती आहे. बावीस तारखेनंतर भारतीय सेनेला खुली सूट देण्यात आली. सेनेने अनेक दशकांपासून जे झाले नव्हते ते करून दाखवले. शेकडो किलोमीटर शत्रूच्या भूमीत घुसून दहशतवादी हेडक्वार्टर्स उद्ध्वस्त केली आणि त्यांच्या इमारतींचे अवशेष बनवले. पाकिस्तानची झोप उडाली आहे आणि रोज नवनवीन खुलासे होत आहेत. भारताने आता एक 'न्यू नॉर्मल' स्थापित केला आहे. दहशतवादाला आणि दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांना आता वेगळे मानले जाणार नाही. ते सर्व मानवतेचे समान शत्रू आहेत. भारताने आता न्यूक्लियर ब्लॅकमेल सहन न करण्याचा निर्णय घेतला आहे. 'न्यूक्लियर ब्लॅकमेल' खूप काळापासून सुरू आहे, पण आता ते सहन केले जाणार नाही. भविष्यातही शत्रूंनी असे प्रयत्न सुरू ठेवल्यास, भारतीय सेना आपल्या अटींवर, आपल्या वेळेनुसार आणि आपल्या पद्धतीनुसार लक्ष्य साध्य करेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola